यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त 12 हजार विद्यार्थ्यांची शब्दसुमनांची आदरांजली .


कऱ्हाड : जेष्‍ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रितिसंगमावरील समाधीस्थळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदींसह मान्यवरांनी अभिवादन केले. दरम्यान आदरणीय पी. डी. पाटील प्रतिष्ठानच्यावतीने जयंतीनिमीत्त विविध शाळांतील 12 हजार विद्यार्थ्यांनी शब्दसुमनांची आदरांजली वाहिली.
अभिवादनानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांना गहिवरुन आले. यशवंतराव चव्हाण यांची समाधी पालिकेतर्फे फुलांनी आकर्षक सजावण्यात आली होती. सकाळपासूनच विविध खेत्रातील मान्यवरांसह नागरीक समाधीस अभिवादन करण्यासाठी येत होते. दुपारपर्यंत खासदार पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष कबुले, उपाध्यक्ष विधाते, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार, आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्‍ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, जशराज पाटील, प्रकाशराव पाटील, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील, प्रदीप पाटील, निवास थोरात, अर्चना देशमुख, सागर शिवदास, शंकरराव खबाले, श्री. देसाई, माजी सभापती शालन माळी, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती किरण पाटील, आरोग्य सभापती महेश कांबळे, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, अंजली कुंभार, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण सभापती सविता खाडे, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मनोज जाधव, नगरअभियंता ए. आर. पवार, आर. डी. भालदार, मिलींद शिंदे, सचीन कोकणे, माणिक बनकर, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरीकांनी समाधीस अभिवादन केले.