महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा❗


लॉकडाऊन  5 वा दिवस


कोरोना एक महाभयानक संकट


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
कोरोनाचे महाभयानक संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य केले पाहिजे .तरच आपण हे जीवघेणे संक्रमण रोखू शकतो अन्यथा महासत्ता असणाऱ्या अमेरिका, प्रगत देश इटली, फ्रान्स, चीन यांच्या पेक्षाही भयानक संकटाचा सामना करण्याची वेळ आपल्यावर येईल व त्यावेळी देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. यानंतर पश्चाताप करून काही होणार नाही. तेव्हा वेळ गेलेली असेल व सर्व काही संपलेले असेल. यासाठी घरी राहा गर्दी टाळा विनाकारन भटकंती करू नका .सर्व प्रकारची काळजी घ्या . प्रशासनाला सहकार्य करा .तर आणि तरच आपण या जीवघेण्या संक्रमणावर मात करू शकतो. 


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾



कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली आणि काही तासात या महाकाय देशात अंमलबजावणी होऊन संपूर्ण देश  लॉकडाऊन  झाला. नागरिकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. देशातील प्रत्येक नागरिक याची चर्चा करू लागले. आजपर्यंत हा शब्द ऐकून माहीत होता .मात्र आज प्रत्यक्षात विलक्षण अनुभव सर्व देश घेत होता.
 अमेरिका, स्पेन, फ्रान्स, इटली या बलाढ्य देशाची कोरोनाने महाभयंकर अवस्था केली .या विषाणूमुळे सुरू असलेेेले मृत्यूचे तांडव संपूर्ण जगाने पाहिले. अनुभवले. या महाभयंकर विषाणूने आपले भयानक रूप दाखवायला चालू केले .व आज अनेक देश या विषाणूची शिकार बनले. आपल्या देशाला या विषाणूची लागण सुरू होताच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकांची व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी व हे संक्रमण रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन ची घोषणा केली. देश हितासाठी व देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी  व या भयानक संकटाला   रोखण्यासाठी मोदींनी हा धाडसी निर्णय घेतला.व संपूर्ण देशाने या या निर्णयासाठी  सहकार्य करण्याची  भूमिका दाखवली. हे महाभयंकर संक्रमण रोखण्यासाठी हा धाडसी निर्णय देशाच्या पंतप्रधानांना घेणे भाग पडले.
आज लॉकडाऊन चा पाचवा दिवस. मात्र कालपर्यंत संपूर्ण भारत देशातील कोरोना बाधित   संख्या 1000 च्या वर पोहचली आहे. महाराष्ट्रात बाधित संख्या आज
203 एवढी झाली आहे. देशातील एकूण बळींची संख्या 24 वर गेली आहे तर महाराष्ट्रातील बळींची संख्या 8 झाली आहे. महाराष्ट्रात बाधित  झालेल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. हे चित्र खूप गंभीर आहे. यामध्ये एकट्या सांगलीत ही संख्या 24 झाली आहे . इस्लामपूर  येथील एक कुटुंब   सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आले होते. त्यांच्या  संपर्कात आल्याने त्यांच्याच कुटुंबातील इतर 24 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 337 लोकांना प्रशासनाने होम कोरंटाईन  मध्ये ठेवलेले  आहे . यामुळे  संपूर्ण इस्लामपूर मध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने हाय अलर्ट लागू केला आहे. संपूर्ण शहर दहशतीखाली आहे. .प्रशासनाने या कुटुंबाच्या घराच्या परिसरातील पाचशे मीटरवर सर्व सीमा सील केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 31 मार्चपर्यंत पूर्ण शहर सील केले आहे. इस्लामपूर जणू कोरोनाचे केंद्र बनले आहे. या पार्श्वभूमीवर तीन तज्ञ डॉक्टरांचे पथक मुंबई येथून काल सांगलीत दाखल झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य पथके कार्यरत आहेत.
 हा महाभयानक विषाणू महाराष्ट्रातील, जिल्ह्यातील गावागावात शिरकाव करू पाहत आहे. याला वेळीच रोखण्यासाठी या विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रशासन यांनी दिलेल्या सूचना, आदेश याचे सर्व सुज्ञ नागरिकांनी तंतोतंत पालन केले पाहिजे. सर्वांनी घरी राहून, घरी थांबून आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही याचे भान ठेवणे काळाची गरज आहे. राज्यातील सर्व डॉक्टर, प्रशासन, पोलीस यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून तुमच्या प्रत्येक कुटुंबाच्या संरक्षणाकरिता रस्त्यावर उतरून काम करत आहेत .  जनतेची, ,रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक जण उपाशी राहून 24 तास कार्यरत आहेत. त्यांना सुद्धा त्यांचे कुटुंब ,आई-वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. या परिवाराचा विचार न करता तुमच्या, आमच्या,कुटुंबासाठी जीवाची पर्वा न करता सेवा करत आहेत. त्यांना सहकार्य करा व घरात थांबून कोरोना रोखण्यासाठी सांगितलेल्या उपाययोजना करा. हीच तुमच्यासाठी देशसेवा असेल. ती प्रत्येकाने प्रामाणिकपणे करणे आज काळाची गरज आहे.
जगातील प्रगत देशाचे मृत्यूतांडव डोळ्यासमोर आपण पाहत आहोत. आपल्या देशाची लोकसंख्या 135 कोटीच्या घरात आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात या विषाणूंचे संक्रमण वाढले तर काय होईल ❓ त्याचे परिणाम किती भयंकर असतील याचे शब्दात सुद्धा वर्णन करता येणार नाही. मात्र वास्तव डोळ्यांनी पाहत असताना आजही आपले अनेक बांधव कारण नसताना गावात भटकत आहेत. होऊ घातलेल्या संकटाची तमा न बाळगता अनेक तरुण मौजमजा करत आहेत. रंगीत पार्ट्या करत आहेत. एकत्र येत आहेत.  पत्त्याचा डाव गावातील झाडाखाली रंगत आहे. बाजारात कारण नसताना एकाच वेळी अनेक जण गर्दी  करत आहेत. असे अनेक जन  संसर्ग वाढेल अशा पद्धतीचे कृत्य करून प्रशासन,व पोलिसांचे कामावरील  ताण वाढवत आहेत. प्रशासनाची कोणतीही सूचना , आदेश हा बेजबाबदार युवक पाळताना दिसत नाही . हे भयानक वास्तव आज संपूर्ण महाराष्ट्रात, जिल्ह्यात दिसत आहे. सुसंस्कृत ओळख  असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात असे चित्र दिसणे ही शोकांतिका आहे.
अशा बेजबाबदार, रिकामटेकड्या भटकणाऱ्या युवकांना पोलीस खाकीचा दणका देत आहेत . विविध प्रकारच्या शिक्षा करत आहेत. मात्र तरीसुद्धा काही लाज नसणारे , तमा न बाळगणारे काही महाभाग आजही बेलगाम आहेत. यांना प्रशासनाने, पोलिसांनी शोधून काढून त्यांना कायद्याचा हिसका दाखवून वेळीच रोखणे काळाची गरज आहे.


 देशातील प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक नागरिकाची काळजी घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विविध प्रकारच्या योजना, घोषणा नागरिकांसाठी केलेल्या आहेत.कुणीही उपाशी राहू नये म्हणून केंद्र व राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवत आहेत. त्यांना फक्त गरज आहे ती आपल्या सहकार्याची . व ते सहकार्य म्हणजे प्रत्येक नागरिकांनी घरात थांबून एक प्रकारची स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे. हीच या घडीची देशसेवा आहे. याचे चांगले परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळतील.
प्रशासनाचे आदेश,संदेश सूचना त्याचे पालन देशातील राज्यातील नागरिकांनी तंतोतंत न केल्यास व मला काही होणार नाही या अविर्भावात जाऊन भटकंती करून संसर्ग वाढवल्यास या महाभयानक विषाणूचा वाऱ्यासारखा वनवा पेटायला वेळ लागणार नाही. याची दक्षता घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. व काळाची गरज आहे .तसे न केल्यास भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. अशा बेजबाबदार नागरिकांच्या मुळे अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स या देशाावरील आलेल्या महासंकटाच्या पंक्तीत बसायला आपल्याला वेळ लागणार नाही. पण त्यावेळी वेळ निघून गेली असेल पश्चाताप करायला ही कुणीही मागे राहणार नाही. याचे भान प्रत्येक सुज्ञ नागरिक ठेवतील . हीच अपेक्षा.


संपादक : चंद्रकांत चव्हाण .