ढेबेवाडी पोलीस  ठाणे येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन.


पोलीस विभाग, महसूल विभाग,पत्रकार संघ,पोलीस पाटील यांचा सहभाग.


प्रतिनिधी : ढेबेवाडी .ता.पाटण येथे दिनांक 15 रोजी पोलीस ठाण्याच्या ग्राउंडवर ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उत्तमराव भजनावळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले.


           रोजच्या धकाधकीच्या धावपळीत वेळात वेळ काढून पोलीस कर्मचारी, महसूल विभाग, वांगव्हॅली पत्रकार संघ व ढेबेवाडी विभाग पोलीस पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा भरपूर आस्वाद घेतला.
          पोलीस कर्मचारी यांचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे साहेब यांनी केले.महसूल विभागाचे नेतृत्व मंडळलाधिकारी प्रवीण शिंदे यांनी केले,वांगव्हॅली पत्रकार संघाचे नेतृत्व संजय लोहार यांनी केले, तर पोलीस पाटील संघाचे नेतृत अमित शिंदे व राजेश लोहार यांनी    केले.
          सामन्याला पोलीस पाटील यांच्यात सुरुवात झाली, दुसरा सामना वांगव्हॅली पत्रकार संघ व पोलीस कर्मचारी यांच्यात झाला, तिसरा सामना पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांच्यात झाला तर सांगता महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यात झाला.सर्व सामन्यात पोलीस कर्मचारी यांनी विजय प्रस्तापित करून आपले वर्चस्व दाखवले.
        या क्रिकेटच्या सामन्याच्या नियोजनामुळे चार वेगवेगळ्या स्तरावरील संघाने आपले वर्चस्व दाखण्याचे काम केले.या अनोख्या नियोजनाने सामाजिक व मैत्री पूर्ण संबंध निर्माण होतील अशी आशा सहायक पोलीस निरीक्षक भजनावळे साहेब यांनी व्यक्त केले.