राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत चष्मे, दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय
राज्यातल्या तब्बल पावणे दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे 20 कोटी रुपये अनावर्ती आणि पाच कोटी रुपये आवर्ती खर्च अपेक्षित आहे. राज्यातील 9 लाख 75 हजार विद्यार्थ्यांना चष्मा वाटपाचा हा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच भविष्यात त्यांच्या नंबरात बदल झाल्यास त्याचा देखील खर्च सरकार उचलेल अशी तरतूद करण्यात आली आहे.