समाजात विकृती म्हणून जगू नका प्रकृतीचा घटक म्हणून जगा ः दिपज्योती पाटील


श्री संतकृपा इंजिनिअरिंग या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील.


कराड  ता. (प्रतिनिधी)-
शिक्षणाने, विचाराने आपण समृद्ध होतो. आर्थिक श्रीमंतीेपेक्षा शिक्षण हीच खरी श्रीमंती आहे. तिच्या जोरावरच आपण जीवनात यशस्वी होवू शकतो. संस्कार हिच जीवनाची शिदोरी आहे. जीवनात प्रत्येक व्यक्तीने चांगले संस्कार जोपासून आदर्श नागरीक होण्याचा प्रयत्न करा. तरच जीवन समृद्ध होईल असे मत कराडच्या पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांनी व्यक्त केले.
घोगाव (ता.कराड) येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाविद्यायाच्यावतीने प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासून संस्कारक्षम असले पाहीजे. एक आदर्श नागरिक बनले पाहीजे. ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी. आपल्याकडून इतरांना त्रास देणार नाही असे आपले वर्तन असावे. आपल्याकडून कोणताही गुन्हा घडणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी.
कायद्याने मुलींना खूप संरक्षण देण्यात आले आहे. मुलींनी निर्भयपणे राहीले पाहिजे. कायदे खूप कडक झाले आहेत. गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा मिळते. सोशल मीडिया, वॉटस्अप, स्टेट्स यावर पोलिसांची करडी नजर आहे. सवार्ंनी संस्कारक्षम व आदर्शवादी राहीले पाहीजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा काळे यांनी केले तर शितल सुतार यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आभार मानले.