जी-पॅट परीक्षेत श्री संतकृपा फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश


श्री संतकृपा फार्मसीच्या यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ.विजयानंद आरलेलीमठ व इतर


कराड  ता. (प्रतिनिधी)-
घोगाव (ता.कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जी-पॅट या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार्‍या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. एनटीए मार्फत घेण्यात येणार्‍या या परीक्षेत या महाविद्यालयातील विद्यार्थिनी उत्कर्षा परीट, ंऋतुजा यादव, तसेच रोहन सूर्यवंशी व प्रफुल्ल कोळेकर यांनी विशेष यश संपादन केले.
या उज्वल यशासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालक सागर पाटील  यांनी अभिनंदन केले.


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज