कौतुकास्पद! 6 वर्षांच्या ध्रुवीने सिंहगडावरील तान्हाजी कडा सर करुन शिवरायांना दिली मानवंदनाआपल्या मैत्रिणींसोबत इकडे तिकडे बागडणाऱ्या या चिमुरडीकडे बघून कोणालाही खरं वाटणार नाही की तिने चक्क 450 फुटांचा तान्हाजी कडा सर केलाय म्हणून. पण होय हे खरं आहे...हे बघा तिच्या पराक्रमाचे फोटो आणि काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं.


ध्रुवीने अत्यंत कठीण असणाऱ्या सुमारे 450 फूट उंचीच्या तानाजी कड्यावर चढाई केली. सुमारे 350 वर्षांपूर्वी पुरंदरच्या तहात गेलेला कोंडाणा किल्ला परत घेण्यासाठी माघ वद्य अष्टमीला रात्री तानाजी मालूसर्यानी चढाई केलेला तानाजीकडा 6 वर्षाच्या चिमुरडीने सर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त 6 वर्षांच्या ध्रुवी गणेश पडवळ या चिमुरडीने सिंहगडावरील तान्हाजीकडा सर करून मावळ्यांना अभिवादन केले. तिच्या या धैर्याचे राज्यभरात कौतुक होत आहे. हा कडा सर करण्यासाठी ध्रुवी पडवळ ही राजे शिवाजी क्लायम्बिंग वॉल शिवाजी नगर पूणे येथे गेल्या 6 महिन्यांपासून दररोज अथक परीश्रम करीत होती


या चिमुरडीच्या धैर्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इतक्या कमी वयात तिने धैर्याने न डगमगता हा अत्यंत कठीण तानाजी कडा सर केला. शिवाजी महाराजांवरील प्रेम व तान्हाजी सिनेमातून प्रेरणा घेऊन तिने अगदी सहज वाटावा अशा पद्धतीने या कडा सर केला. तिला मानाचा मुजरा.


ध्रुवी पडवळ ही राजे शिवाजी क्लायम्बिंग वॉल शिवाजी नगर पूणे येथे गेले 6 महिन्या पासून रोज सराव करते. या मोहिमेत तिच्या सोबत लहू उघडे, कृष्णा मरगळे, तुषार दिघे, विकास जोरकर, रोहित आंदोडगी, मानसिंग चौहान, सारंग तापकीर, प्रसाद बागवे, प्रसाद एकशिंगे, हर्षदा गणेश पडवळ (आई), पारस पडवळ (काका) सहभागी होते व अमोल जोगदंड, मांतू मंत्री, इरफान शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले


खरंतर शिवजयंतीला अनेक प्रोफेशनल ट्रेकर्सनी सिंहगडावरचा हा अवघड कडा सर केलाय. पण सर्वांच्या नजरेत भरली ती ही चिमुरडीच...कारण एवढ्या कोवळ्या वयात ट्रेकिंगला जाणे ही काही खायची गोष्ट नाही .म्हणूनच या चिमुरडीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. किल्ल्यावर पोहचताच 'जय भवानी जय शिवाजी' असा जय घोष करत ध्रुवीची घोड्यावरून मिरवणूक काढून तानाजी मालूसर्यांच्या समाधीजवळ क्षितिज क्षीरसागर याने पोवाडा म्हणून मोहिमेची सांगता झाली. चिमुरड्या ध्रुवीला ट्रेकिंगचं हे वेड आपल्या घरातूनच म्हणजे आईपासूनच मिळालंय. तिची आई हर्षदा पडवळ या देखील उत्तम ट्रेकर आहेत...तान्हाजी सिनेमा पाहुनच ध्रुवीने हा कडा सर करण्याचा हट्ट धरल्याचं त्या सांगतात


किल्ल्यावर पोहचताच 'जय भवानी जय शिवाजी' असा जय घोष करत ध्रुवीची घोड्यावरून मिरवणूक काढून तानाजी मालूसर्यांच्या समाधीजवळ क्षितिज क्षीरसागर याने पोवाडा म्हणून मोहिमेची सांगता झाली. कडा सर करताना तिने सांगितलेले अनुभव शब्दश: अंगावर काटा आणणारे होते.