वांग व्हॅली च्या विविध दालनाचे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घघाटन

वांग व्हॅली च्या विविध दालनाचे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घघाटन
तळमावले  /प्रतिनिधी : वांग व्हॅली भवन ,सहकार प्रशिक्षण केंद्र , व वांग व्हॅली क्रेडिट सोसायटी तळमावले शाखेचे शनिवार दिनांक 25/1/2020 रोजी दुपारी चार वाजता तळमावले तालुका पाटण येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज व अद्ययावत अशा भव्य इमारतीत या तीन दालनाचा शानदार उद्घघाटन सोहळा संपन्न होणार आहे. पाटण तालुक्याच्या तीन मान्यवर सूपूत्रांच्या हस्ते या  सोहळ्याचे उद्घघाटन होत आहे. हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये आहे. वांग खोऱ्यातील अनेक गावांचे केंद्रस्थान असलेल्या तळमावले बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज, अध्यावत व भव्य इमारतीत  या वांग व्हॅली क्रेडिट सोसायटी च्या या तीन उपक्रमांचा शुभारंभ होत आहे.यामुळे या परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
वांग व्हॅली भवन ,सहकार प्रशिक्षण केंद्र, या संस्थेच्या तळमावले शाखेचे उद्घघाटन अशा तिहेरी दालनाचा शानदार शुभारंभ उत्कृष्ट संसदपटू राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा), खासदार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील .या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे.
या भव्य सोहळ्यासाठी राज्याचे सहकारमंत्री ना.बाळासाहेब पाटील. माजी खासदार .आनंदराव अडसूळ. मा.विलासराव पाटील ( काका). मा.विक्रमसिंह पाटणकर,महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष :शेखर चरेगावकर,माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील. आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .अशी माहिती वांग व्हॅली संस्थेचे अध्यक्ष सुभाष बावडेकर यांनी कृष्णाकाठ शी बोलताना दिली


या कार्यक्रमासाठी कराड, पाटण तालुक्यातील संस्थेचे हितचिंतक ,ठेवीदार ,सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे .असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुभाष बावडेकर यांनी केले आहे.