स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारे व्यासपीठ : सागर पाटील

.


श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संचालक सागर पाटील यांचा सत्कार करताना प्राचार्य स्वानंद कुलकर्णी व इतर मान्यवर.


कराड :दि.३१


महाविद्यालयातील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असते वर्षातून एकदा होणाऱ्या स्नेहसंमेलनाची  विद्यार्थी वाट पाहत असतात . यातूनच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळते.हीच प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी भविष्यात  चांगले कलाकार म्हणून उदयास येतात. म्हणूनच स्नेहसंमेलन म्हणजे भविष्यातील कलाकार घडविण्याचे जणू व्यासपीठ होय.
असे प्रतिपादन श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संचालक श्री सागर पाटील यांनी केले.
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी बी फार्म ,डी फार्म, श्री संतकृपा इंजिनीरिंग व जूनियर सायन्स कॉलेज या चार महाविद्यालयांचे संयुक्त संमेलन कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात नुकतेच संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते या संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंजिनिअरिंग  महाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथी श्री सागर पाटील यांचे बुके देऊन महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले तर फार्मसीचे प्राचार्य डॉ.  विजयानंद अरलेलीमट यांनी संतोष भीवर यांचे महाविद्यालयाच्या वतीने बुके देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. वैशाली महाडिक यांनी केले.  यामध्ये त्यांनी प्रमुख अतिथींचा परिचय व संस्थेची माहिती दिली. तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता थोरात यांनी केले.
 


सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी सचिव प्रसून जोहरी व इतर संचालक यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.


सदरकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी प्राचार्या पुष्पा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.