पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र : मुख्यमंत्री

पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र : मुख्यमंत्री


पोलिसांसाठी पुणे : नेमबाजी हा श्रृवासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. म्हाळुगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे १३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी (क्रिडा) अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोव्हे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल ___ ज्येष्ठ महिला नेमबाज चंद्रो तोमर, श्रीमती प्रकाशी तोमर (शुटर दादी), पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, निवृत्त पोलीस अधिकारी टी. एस. धिल्लन, रितू छाब्रिया उपस्थित होते. ___ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, कोणत्याही स्पर्धेत जय-पराजय या गोष्टी होतच असतात. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस दलाच्या नेमबाजीतील गुण तक्त्यामुळे समाजातील अपप्रवृत्तीवर दहशत बसेल. हा खेळ श्रवासावर नियंत्रण राखणारा मेंदच्या योगाचा आणि मनःशांतीचा उत्तम पर्याय आहे. याचसाठी मला नेमबाजीचा छंद आहे. जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पढे म्हणाले. तोमर दादी या देशाच्या प्रेरणा आहेत. देशातील प्रत्येक पोलिसांचा नेम अचूक असणे आवशयक आहे.