कार्वे येथील अडीच एकर उसाला आग .

कार्वे येथे अडीच एकरातील ऊसाला आग
कराड/प्रतिनिधी : 
          कार्वे ता. कराड येथील शेतकऱ्याच्या अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. शुक्रवारी 24 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. सदर आग लागली नसून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार शेतकरी यशवंत भीमराव थोरात रा. कार्वे ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाणे धाव घेतली. यासंदर्भात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 
          याबाबत मिळालेली माहिती अशी की, कार्वे ता. कराड येथे शुक्रवारी 24 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली. यादरम्यान, आग लागली तेव्हा दोन अज्ञात इसमांना आग लागलेल्या शेताजवळ काही गावकऱ्यांना पाहिले आहे. त्यामुळे ही आग लागली? की लावण्यात आली? यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. शेताच्या कोणताही बाजूस इलेक्ट्रिक खांब वा त्या ठिकाणाहून विद्युत वायर गेलेली नाही. त्यामुळे ऊसाला आग लावण्यात आल्याची शक्यता असल्याने शेतकरी यशवंत भीमराव  थोरात यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत या तक्रारीची नोंद करण्याचे काम सुरू होते.


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज