विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत : उपमुख्यमंत्री

बारामती :- सध्या सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवशयकतेप्रमाणे व प्राधान्याने वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथील सध्या सुरु असलेल्या विविध ठिकाणच्या विकासकामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश क्सकर, उप विभागीय कृषी अधिकारी बालाजी ताठे, भूमि अभिलेखचे अधिक्षक शिवप्रसाद गौरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आज झालेल्या या पाहणी दौ-यामध्ये बारामती एस.टी.बसस्थानक, एमआयडीसी येथील एस.टी. बस डेपो, पोलीस वसाहत, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह तसेच नियोजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय इ.ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता संजयकुमार तांबे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सध्या बांधकाम आराखड्यानुसार सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी येणा-या नागरीकांना प्रसन्न वाटावे अशा प्रकारचे वातावरण असावे, भूमीगत विद्युत तारा बसविण्यात याव्यात, पुणे शहरामध्ये बांधकाम करण्यात येत असलेल्या पोलीस वसाहतींच्या इमारतींच्या आराखड्याचा अभ्यास करुन त्याप्रमाणे बारामती येथील पोलीस वसाहतीचा प्लॅन तयार करावा, एस.टी. बसस्थानक परिसरातील स्वच्छता व पार्कीग व्यवस्थेबाबत संबंधितांना सूचना केल्या.


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज