ओगलेवाडी येथे एका युवकावर हल्ला प्रकृती चिंताजनक..

कराड/प्रतिनिधी:
ओगलेवाडी ता. कराड येथे एका युवकावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेनंतर ओगलेवाडीसह कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नरेंद्र कदम (वय 22) रा. ओगलेवाडी, ता. कराड असे वार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी येथे शनिवारी सायंकाळी रेल्वे पुलानजीक युवकांच्या दोन गटात काही कारणाने किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांच्यातील काही जणांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटवला होता. दरम्यानच्या कालावधीत नरेंद्र कदम हा त्याच परिसरात असताना दुसऱ्या गटातील युवकांनी त्याठिकाणी परत येऊन त्यातील काही जणांनी त्याच्यावर अचानकपणे धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात नरेंद्र गंभीर जखमी झाला. याचवेळी तेथूनच जिमला निघालेल्या काही युवकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले. नरेंद्र कदम यांच्यावरती धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांसह वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ओगलेवाडी येथे युवकांवर खुनी हल्ला झाल्याची माहिती मिळताच ओगलेवाडीसह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरातही युवकांनी गर्दी केली होती. त्यामुळे तेथेही कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी ओगलेवाडीसह उपजिल्हा रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तसेच नरेंद्र जाधव याच्यावर वार करणाऱ्या युवकांचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली आहे.रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज