वंदे भारत चालवणारी देशातील पहिली महिला असा बहुमान.
आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी पुन्हा एका इतिहासाला गवसणी घातली. ट्रेनच्या चालकास लोको पायलट असं म्हटलं जातं. सुरेखा यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली.
या साठी त्या गेल्या महिनाभरापासून प्रशिक्षण घेत होत्या. वंदे भारत चालवणारी देशातील पहिली महिला असा बहुमान त्यांना मिळाला आहे .
गेल्या अनेक वर्ष मालगाड्यांपासून ते प्रवासी रेल्वे गाड्या चालवल्यानंतर सुरेखा यांचं वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे स्वप्न होते. ते अखेर पूर्ण झालं. मूळच्या सातारच्या कन्या असलेल्या सुरेखा यादव यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाहून वेळेत प्रस्थान केलं.
निर्धारीत वेळेपेक्षा ५ मिनिट अगोदर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं. यावेळी, नव्या युगातील हायस्पीड वंदे भारत रेल्वे चालवण्याची संधी आणि जबाबदारी दिल्याबद्दल रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले. पहिली महिला पायलट म्हणून नियुक्ती झाल्यावर यादव यांचा रेल्वेकडून सत्कार करण्यात आला.
मूळच्या सातार कन्या असलेल्या सुरेखा यादव यांनी त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथील सेंट पॉल शाळेत झाले. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण करून भारतीय रेल्वेत त्यांनी नोकरी सुरू केली. १९८९ मध्ये सहाय्यक चालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
१९८८ मध्ये रेल्वे विभागात नोकरी जॉईन केली. त्यावेळी, आशियातील पहिली महिला लोको पायलट होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. आता, लोको पायलट प्रशिक्षक बनूनही त्या कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष रेल्वे सेवेत मालगाडी तसेच प्रवासी रेल्वे चालवणाऱ्या सुरेखा यांचं वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचं स्वप्न होतं. सोमवारी ते पूर्ण झालं.
गाडीतील नवीन उपकरणे त्यांना हाताळण्यासाठी पायलटला योग्य प्रशिक्षण देण्यात येते. हे सर्व प्रशिक्षण यादव यांनी पूर्ण केलं. त्यानंतर प्रथमच वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य करताना आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट होण्याचा मान मिळवला आहे. सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात नाव कोरले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.