अग्निपंख शैक्षणिक समुहाच्या कराड तालुका समन्वयकपदी शुभांगी विलास पवार यांची निवड.
सातारा दि.11: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाल (बेघरवस्ती) ता.कराड, जि.सातारा शाळेच्या शिक्षिका कु.शुभांगी विलास पवार यांची अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य डिजीटल उपक्रमाच्या कराड तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली.

     शिक्षक अध्यापन करत असताना शुभांगी विलास पवार यांनी अनेक उपक्रम, जयंत्या, स्मृतिदिन, प्रत्यक्ष कृतीद्वारे शिक्षण, सामान्य ज्ञान स्पर्धा,प्रश्नमंजुषा कार्यक्रम, कविता गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या उत्कृष्ट कार्यापासून इतरांना प्रेरणा मिळेल. अशा कार्याची प्रचिती होण्यासाठी आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याची संधी या निवडीमुळे उपलब्ध होत आहे. आपण केलेले कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत पोहोचून वाचायला व शिकायला मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होईल.

आपल्या शाळेत नवोउपक्रम युक्त शिक्षण देण्यास मदत होईल. "अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य"आपल्या हक्काचे व्यासपीठ असून आपल्या कार्याला प्रसिद्धी मिळेल.  शाळेतील शिक्षकांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने आपल्या शाळेत उत्कृष्टरित्या घेत असलेल्या कार्याचे फोटो,व्हिडिओ, यशोगाथा स्टडी फॉर्म होम, लेख, कविता अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र या ग्रुपवर शेअर कराव्यात असे शुभांगी पवार यांनी कळविलेे आहे.

 कराड तालुका समन्वयक या पदी निवड केल्या बद्दल गजानन गोपेवाड राज्य समन्वयक यांचे त्यांनी आभार मानले.