खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून जिल्हा रुग्णालयात पीपीई किट व इन्फ्रारेड थर्मामिटरचे वाटप


खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून जिल्हा रुग्णालयात पीपीई किट व इन्फ्रारेड थर्मामिटरचे वाटप


सातारा 4 (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना विषाणू विरोधात अविरत लढा देणाऱ्या योद्ध्यांना खा. उदयनराजे भोसले यांनी पीपीई किट वाटप केले.


 वैद्यकीय आधिकारी, नर्सेस, लॅब टेक्नीशियन, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या कामाचे कौतुक करत अशा आधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेणे आद्य कर्तव्य असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.


यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर धुमाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, ॲड बनकर, सुनिल काटकर व रुग्णालयातील आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


डॉ. सुधीर बक्षी प्रशासकीय अधिकारी यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुहास माने यांनी आभार मानले.